पोदार स्कूलच्या जय जाधवचे अष्टपैलू प्रदर्शन

Foto
पोदार, नाथ व्हॅली, आर. जे. इंटरनॅशनल, गायकवाड, चाटे स्कूलचे विजय
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत बुधवारी पोदार इंटरनॅशनल स्कूलचा कर्णधार जय विष्णू जाधवचे अफलातून अष्टपैलू प्रदर्शन, स्वरीत दरकचे शानदार अर्धशतक आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विविध संघांनी वर्चस्व गाजवले.
पोदारचा २४५ धावांनी विजय एडीसीए मैदानावर झालेल्या सामन्यात पोदार इंटरनॅशनल
स्कूलने सीएसआर इंटरनॅशनल संघाचा २४५ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना पोदारने २० षटकांत १ बाद २६६ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार जय विष्णू जाधवने अवघ्या ७७ चेंडूंत २९ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १८९ धावांची वादळी खेळी केली. युवराज रौत्रेने नाबाद ५० धावा करत त्याला उत्तम साथ दिली.
आर. जे. इंटरनॅशनलचा एसएफएस स्कूलवर विजय
आर. जे. इंटरनॅशनलने
एसएफएस हायस्कूलचा ४८ धावांनी पराभव केला. आर. जे. स्कूलने देवांश नलवडे (५२) आणि तथागत पांडे (५०) यांच्या अर्धशतकांच्या बळावर ६ बाद १७० धावा केल्या. एसएफएसकडून मुजम्मिल शेखने ३ बळी घेतले. मोहम्मद वसीमच्या ४९ धावांनंतरही एसएफएसचा डाव १९.३ षटकांत १२२ धावांवर आटोपला. सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी तसेच सामनावीर पुरस्कार प्रदान करण्याप्रसंगी जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रकाश हावनूर, किरण जोशी, जगदीश भावठाणकर, दीपक जोशी, अजय श्रॉफ, साईनाथ सोनवणे, अनिल देवळाणकर, सचिव शिरीष बोराळकर, सहसचिव करण डोगरा, स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल लोळगे, निखिल मिटकर, हेमंत मुळे, अरुण गुदगे, सय्यद जमशीद, गंगाधर मोदाळे, वसीम खान आदी उपस्थित होते.